spot_img
spot_img

Latest Posts

मासिक पाळीमध्ये का जाणवतो थकवा ? जाणून घ्या सविस्तर माहिती

मासिक पाळीमध्ये (Menstrual cycle) सर्वच महिलाना थकवा जाणवतो. यामागे काही कारण देखील असू शकतात.

मासिक पाळीमध्ये (Menstrual cycle) सर्वच महिलाना थकवा जाणवतो. यामागे काही कारण देखील असू शकतात.मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास थकवा येणे, अशक्तपणा, शरीरातील लोहाची पातळी कमी होण्यास सुरवात होते. ज्यामुळे हिमोग्लोबिन (Hemoglobin) देखील कमी होण्याची शक्यता असते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे ऑक्सिजन (oxygen) प्रसारित होऊ शकत नाही म्हणून थकवा जाणवतो. मासिक पाळीच्या दरम्यान पुरेशी झोप आणि योग्य आहार घेण्याची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये शरीराला आरामाची गरज असते. मासिक पाळीमध्ये तुमची जीवनशैली बदलून त्यामध्ये थोडा बदल करून तुम्ही आराम मिळवू शकता.

मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो त्यामुळे शरीरातील लोहाची पातळी कमी होते. हिमोग्लोबिनची कमतरता देखील जाणवू शकते. यामुळे आपल्याला जास्त थकवा येतो. मासिक पाळीदरम्यान हार्मोन्सच्या पातळीत बदल होत असतात. यामुळे मूड बदलणे, झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शक्यता. अनेक महिलांना पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठदुखीचा त्रास, हातपाय सुजणे यांसाखे त्रास होतात. यावेळी आराम करण्याची आवश्यकता असते. काही महिलांना या दिवसांमध्ये चिंता आणि तणाव जाणवतो. मानसिक (mental)आणि भावनिक (emotional)समस्यमुळे थकवा येऊ शकतो.

या दिवसांमध्ये पुरेशी झोप घेणे,योग्य प्रकारे आहार घेणे गरजेचे असते. यावेळी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. हायड्रेटेड (Hydrated) राहिल्याने शरीराचा थकवा कमी होतो. जास्त प्रमाणात पाणी पियाल्याने शरीरातील थकवा कमी होतो. मासिक पाळीच्या वेळी हलका आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीराला एंडोर्फिन (endorphins) सोडतात, जे नैसर्गिक वेदनाशामक असतात. चांगली आणि पूर्ण झोप घेणे अवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान शरीरात अनेक दडलं होत असतात, त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर सुद्धा होतो. पाळीदरम्यान काहींना पोट दुखी आणि पेटके येतात. चांगली झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss