भारतामध्ये प्रत्येकवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) १ ते ७ सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागे काही विशेष कारण देखील आहेत. लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे, वेळेत आणि योग्य प्रकारे आहार घेणे हे निरोगी जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. काही लोकांना आरोग्याची चिंता नसल्यामुळे कधीपण आजारी पडणे, डायबिटीस, शुगर यांसारखे आजार जास्त होण्याची शक्यता असते. आरोग्य सेवेपेक्षा जास्त प्रमाणात रुग्ण संख्या वाढली आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून, भारत सरकारने “राष्ट्रीय पोषण सप्ताह” साजरा करण्यास सुरुवात केली होती. दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. निरोगी जीवनशाली राहण्यासाठी चांगले आणि निरोगी अन्न झाले पाहिजे. सर्वसामान्यांमध्ये जागरूकता यावी म्हणून हा सप्ताह असतो.
१९७५ साली ADA (अमेरिकन डायटेटिक असोसिएशन, आता – अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायट सायन्सेस) यांच्या द्वारे हा सप्ताह साजरा केला जात होता. लोकांमध्ये आरोग्यविषक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानंतर १९८० मध्ये लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला होता म्हणून आठवड्याऐवजी महिनाभर पोषण सप्ताह साजरा करण्यात आला होता . तसेच १९८२ मध्ये भारतातील केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण सप्ताह ही मोहीम सुरु केली. लोकांना निरोगी जीवनाचे महत्व पटवून देणे हा त्यामागचा उद्देश होता.
सध्याच्या महामारीच्या काळात, लोक त्याच्या आरोग्यबाबत जागरूक व्हावेत हा त्यामागचा हेतू आहे . आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि शरीर मजबूत होईल. दैनंदिन जीवनात आहार चक्र नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील ‘वृक्षगजानन’ मूर्तीला मोठी मागणी
Asia Cup 2023, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत विजय, नेपाळचा २३८ धावांनी पराभव…
शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘Jawan’ चित्रपटाचा चा ट्रेलर आऊट, किंग खानचे वेगवेगळे लूक्स आले समोर