Thursday, April 25, 2024

Latest Posts

केस आणि नख कापताना आपल्याला कधीच का त्रास होत नाही…. जाणून घ्या त्यामागचे शास्त्रीय कारण

शरीराला थोडं जरी काही लागलं तरी आपल्याला वेदना होतात. कारण शरीर म्हंटलं तर वेदना या होणारच. पण मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का कि आपण जेव्हा केस किंवा नखं कापतो तेव्हा आपल्याला का बरं वेदना होत नाहीत? केसं आणि नखं हे आपल्या शरीराचेच भाग आहेत.

शरीराला थोडं जरी काही लागलं तरी आपल्याला वेदना होतात. कारण शरीर म्हंटलं तर वेदना या होणारच. पण मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का कि आपण जेव्हा केस किंवा नखं कापतो तेव्हा आपल्याला का बरं वेदना होत नाहीत? केसं आणि नखं हे आपल्या शरीराचेच भाग आहेत. परंतु शरीराच्या अगदी लहानातल्या लहान भागाला जरी थोडस खरचटलं तरी आपल्याला तीव्र वेदना होतात. पण आपण अनेक वेळा केस कापतो आपल्या हाताची नखे कापतो तेव्हा आपल्याला जरा सुद्धा वेदना होत नाही. आपण अगदी जन्मल्यापासून केस आणि नखे कापतो. आजकाल तर आपण नखांना वेगवेगळे शेप देतानाही बघितले आहे तशी फॅशनच झाली . आपण मोठमोठ्या सॅलोन मध्ये जाऊन, न्हाव्याकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारे केस कापतो.तसेच आपल्या केसांना आपण हिट देऊन स्मूथनिंग करतो तरी सुद्धा आपल्या केसांना अथवा नखांना वेदना होत नाहीत . केस आणि नखे या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराचा भाग असून ते कापताना आपल्याला कधीच वेदना होत नाही. पण यामागचे नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण.

आपल्या शरीराचे भाग असलेले केस आणि नखं हे मृत पेशींनी बनलेले असतात. आणि म्हणूनच आपल्याला केस कापतांना किंवा नख कापताना कसल्याही प्रकारची इजा होत नाही. मृत पेशी म्हणजेच डेड सेल्स (dead cells). नखे हि आपल्या त्वचेपासून जन्माला येतात. हीच नखे केराटिन नावाच्या घटकापासून बनतात. नखांची मुले हे आपल्या त्वचेच्या आत असून नखांच्या खाली असलेली आपली त्वचा हि शरीराच्या अन्य भागांसारखीच असते. नखे हि आपल्या शरीराचे विशेष म्हणजे आपल्या हाताचे सौंदर्य खुलवतात. जेव्हा हि नखे मोठी होतात तेव्हा आपण ती कापतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही. पण आपण जर आपल्या त्वचेला चिकटलेलं नख काढळायला गेलो तर आपल्याला प्रचंड वेदना होऊ शकते. त्याचे कारण म्हणजे तिथल्या पेशी जिवंत आहेत.

आपण आपल्या नखांची काळजी घेतली पाहिजे. नखे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तसेच नख आपलं सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. महिला आपल्या नखांची काळजी घेत असतात. नखांना वेगवेगळ्या रंगाचे नेल पोलीश लावून आपले सौंदर्य अधिकच फुलवतात.

हे ही वाचा : 

कर्नाटकाच्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट करून केले अभिनंदन

या अभिनेत्रीला पाहताच क्षणी मिळाली सिनेमात काम करण्याची संधी …… कोण आहे ती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss