हिवाळ्याच्या दिवसात मुलांना सतत सर्दी खोकल्याचा त्रास होतच असतो त्यामुळे मुलं आजारी पडत असतात आणि शाळेला सुट्टी करावी लागते तर अशा समस्यांपासून वाचण्यासाठी त्याचा नाश्त्यात किंवा लंचमध्ये ‘या’ ४ हेल्दी पदार्थांचा नक्की समावेश करा.
हिवाळा सुरु आहे, या थंड वातावरणात मुलांना सर्दी , खोकला, ताप, कफ किंवा वायरल इन्फेक्शन अशा अनेक आजारांचा त्रास होतच असतो. विशेषतः शाळेत जाणारी मुले, जी बाहेर थंड वातावरणात खेळतात त्यांना सर्दी पाडसाचा त्रास वारंवार होतच असतो. म्हणून सर्दी खोकल्याच्या बचावासाठी या ४ पदार्थांचा समावेश त्यांच्या आहारात नक्की करा. या पदार्थांमुळे तुमच्या मुलांची इम्युनिटी मजबूत होऊ शकते आणि त्यांना आजारी पडण्यापासून वाचवू शकता.
व्हेजी उत्तपा
रव्याला दह्यात १० ते १५ मिनिटे भिजवत ठेवा. त्या नंतर त्या बारीक चिरलेले गाजर, कांदा , ढोबळी मिरची, पनीर, मक्याचे दाणे अश्या अनेक मनपसंदित भाज्या तुम्ही त्यात घालून चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिश्रण एकजीव करून घरगुती तुपात किंवा ऑलिव तेलामध्ये तव्यावर खरपूस भाजून घ्या. या उत्तप्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट , फायबर्स , प्रोटीन, व्हिटॅमिन A, B1, B2, B3, B6, B9, B12,व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे मुलांच्या आहारात याचा नक्की समावेश करा.
मिक्स व्हेजी राईस
मुलांना भात आवडत असेल तर त्यात थोड्या भाज्या खालून मिक्स व्हेजी राईचा नक्की बनवून बघा. या राईसमध्ये असलेल्या व्हिटॅमिन C शरीराला अँटीबॉडी तयार करण्यास मदत करते. तुम्ही या राईसमध्ये मटर, टमाटर, बीन्स अशा अनेक भाज्यांचा समावेश करू शकता आणि नक्कीच हा राईस तुमच्या मुलांना आवढेल.
क्वीन्वा, मखाने आणि दही.
क्वीन्वामध्ये खुप फायबर असते. जे मुलांच्या शरीरासाठी खुप महत्वाचे असतेच त्यासोबत हाडे देखील मजबूत होतात. तुम्ही क्वीन्वा बनवून त्यात दही आणि मखाने खालून त्याच रायत बनवल तर ते खूप टेस्टी होत.
पनीर भुर्जी आणि अजावईन पराठा.
मुलांच्या लंच किंवा टिफिनमध्ये पनीर भुर्जीचा नक्की समावेश करू शकता. पनीर भुर्जी एक झटपट आणि प्रोटीनने भरलेली रेसिपी आहे. जी तयार करण्यात जास्त वेळी खर्च होत नाही आणि खूप हेल्दी देखील आहे.
पराठा तयार करत असताना त्यात थोडं अजावईन आणि मोठ घालावं. हा पराठा मुलांच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम करतो. या पराठ्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता.