spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

Winter Eye Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना डोळ्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी.

हिवाळा सुरु आहे आणि या माहिन्यात जास्त करून लोक त्वचेकडे लक्ष देत असतात. परंतु त्वचेकडे लक्ष देत असताना डोळ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. हिवाळ्यात डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्यांची आग-आग होते किंवा खाज सुटते. अश्यावेळी डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते त्यामुळे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी ही बातमी नक्की वाचा.

हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या उद्भवत असतात, परंतु त्वचेकडे लक्ष देत असताना लोक डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. या थंडीच्या दिवसात डोळ्यांचे अनेक आजार होण्याची शक्यता असते कारण या वातावरणामुळे डोळ्यांची त्वचा कोरडी पडते त्यामुळे डोळे दुखणे , डोळ्यांना खाज सुटणे, जळ-जळ होणे , डोळे लाला होणे अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्ही या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर दृष्टी देखील जाऊ शकते त्यामुळे वेळीच उपचार घेणे खूप महत्वाचे आहे. लक्षणे ओळखून त्यावर उपचार केल्यास डोळ्यांचा कोणताही गंभीर आजार सहज टाळता येतो. डोळ्यांच्या कोणत्या आजारांना धोका असतो आणि त्यापासून बचाव कसा करावा याबद्दल जाणून घेऊयात.

हिवाळ्यात डोळ्यातील कंजंक्टिवाइटिस पासून ते ब्लेफेराइटिसपर्यंतचे आजार डोळ्यांमध्ये होऊ शकतात. कंजंक्टिवाइटिस हा एक सामान्य आजार आहे . या आजारामुळे डोळ्यांना सूज येणे, पाणी येणे अश्या समस्या दिसून येतात. या आजाराला वेळीच नियंत्रणात आणू शकतो नाहीतर दुर्लक्ष केल्यास खूप मोठा आजार होण्याची शक्यता असते.

सिंड्रोम रोगाची शक्यता :
ब्लेफेराइटिसबद्दल बोलायचे झाले तर हा डोळ्यांचा आजार आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या पापण्यांना सूज येऊ शकते. ही सामान्य समस्या आहे परंतु ती दूर करणे खूप महत्वाचे आहे. तणाव, वयोमानानुसार किंवा हवामानामुळे हा आजार होऊ शकतो. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो डोळ्यांच्या स्नायूंवर प्रभाव टाकतो, ज्यामुळे डोळे पांढरे दिसणे आणि दृष्टिहीनता होऊ शकते. ही सर्व लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी :
थंडीच्या दिवसात डोळे कोमट पाण्याने धुवा. या ऋतूत डोळ्यांसंदर्भात समस्या होऊ शकतात त्यामुळे डोळ्यांची चाचणी करणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांमध्ये आय ड्रॉप टाका. अश्याने तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या.

हे ही वाचा:

छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss