Winter Travel : डिसेंबर महिना सुरु आहे आणि या महिन्याला सुट्ट्यांचा महिना म्हणून ओळखले जाते. अश्या या गुलाबी थंडीच्या महिन्यात तुम्ही नक्कीच आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि न्यूइयर पार्टीसाठी लोक कुठे ना कुठे फिरायला जायचा प्लॅन करतच असतात तर काही लोक हिल स्टेशनचा प्लॅन करतात मात्र अश्या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळते. नीट एन्जॉट करता येत नाही. तर काहींना बर्फवृष्टीचा आनंद घेता येत नाही यासाठी लोक हिमालयाला जायचा प्लॅन करत असतात मात्र तिथे जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते पण ही गर्दी तुमची सहल बिघडवते. म्हणूनच तुम्हाला अश्या हिमालय प्रदेशातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हला अजिबात गर्दी पाहायला मिळणार नाही आणि बर्फवृष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येईल.
काही अशी ठिकाण, जिथे गर्दी पाहायला मिळणार नाही
हिवाळ्याच्या महिन्यात कुठेनाकुठे तरी फिरायला जायचा प्लॅन असतोच आणि याचं नेमकं कारण म्हणजे ख्रिसमस आणि न्यूइयर. पण अश्या ठिकाणी कायम गर्दी पाहायला मिळते तर तुम्ही चांगले फोटो कसे काढाल. अश्या लोकांसाठी खास ठिकाणांची माहिती आज आम्ही घेऊन आलो आहोत.
लाचुंग – हिमवर्षावासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते
लाचुंग गाव हिमालयाच्या उंच पर्वतरांगेत स्थित आहे, जेथे थंड वातावरण आणि वळणावर बर्फ पडण्याची संभावना जास्त असते.अश्या ठिकाणी तुम्ही मनमुरादपणे बर्फाचा आनंद घेत, त्याचबरोबर तुम्ही रोमँटिक वातावरण एक्सप्लोर करू शकता. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होतो जिथे तुम्हाला गर्दी देखील पाहायला मिळणार नाही, लाचुंग हे नॉर्थ सिक्कीमच्या प्रसिद्ध ट्रेकिंग मार्गांच्या नजिक आहे जथे निसर्गप्रेमी ट्रेकिंगसाठी जातात.
जुब्बारहट्टी : हिमवर्षावासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक
जुब्बारहट्टीच्या उंच भागामध्ये कमी तापमान असतो, ज्यामुळे ते हिमवर्षाव अनुभवण्यासाठी आदर्श ठिकाण आहे.बर्फवर्षावामुळे पर्यटकांना येथे जाऊन हिमस्नो हायकिंग, ट्रेकिंग आणि साहसी खेळांचा अनुभव घेता येतो. तसेच, जास्त लोक येत नसल्यामुळे, फोटोही चांगली येतील.
गुलाब : हायकिंग, ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता
गुलाबा परिसरात हिरवीगार दऱ्या, झऱ्यांची किणकिण आणि बर्फाचं दृश्य असलेले पर्वत आहे.गुलाबा ट्रेकिंग दरम्यान पर्यटक स्नोबोर्डिंग, स्कीइंग आणि स्नो ट्रेकिंग सारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकत.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule