spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Women’s Day 2025: महिला दिनादिवशी ‘या’ तीन रंगांना विशेष महत्व दिले आहे; जाणून घ्या कोणते आहेत ते रंग?

Women’s Day 2025: आजच्या जगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही. तरीही महिलांनी स्वतःला सिद्ध करत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ८ मार्चला महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाला मान्यता देण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. महिला दिन हा एक महत्त्वपूर्ण जागतिक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं जांभळा, पांढरा आणि हिरवा हे रंग विशेषतः परिधान का केले जातात.

महिला दिन विशेष ‘हे’ तीन खास रंग
जांभळा, पांढरा आणि हिरवा या रंगाचे महिला दिनादिवशी खास महत्व आहे. त्याचबरोबर यामागे एक उद्देश देखील आहे. खास करून या तीन रंगांमुळे महिला दिने विशेष महत्व मानले जाते. जांभळा, पांढरा आणि हिरवा या रंगांना महत्व देण्यामागची कारण म्हणजे ब्रिटनच्या WSPU म्हणजेच वुमेन्स सोशल पॉलिटिकल युनियनने (Women’s Social Political Union) १९०८ मध्ये ठरवण्यात आली. या युनियननेचं या तीन रंगाची निवड करत या तीन रंगा मागचे उद्धिष्ट सांगण्यात आले होते.

काय आहे रंगांचे उद्धिष्ट :
जांभळा रंग:
हा रंग शक्ती आणि अधिकाराचा प्रतीक आहे. जांभळा रंग अनेक वेळा महिलांच्या शक्तीचा, स्वावलंबनाचा आणि समानतेच्या दिशेने प्रयत्नांची घोषणा करणारा मानला जातो.

पांढरा रंग:
पांढरा रंग शांती, पवित्रता आणि निष्कलंकतेचा प्रतीक आहे. महिला दिनाच्या निमित्ताने, हा रंग महिलांच्या असमानतेला विरोध करण्याच्या आणि समानतेच्या मागणीच्या शांततामय मार्गाने प्रकट होणारा रंग असतो.

हिरवा रंग:
हिरवा रंग समृद्धी, आशा आणि जीवनाची नवीनता दाखवतो. महिलांच्या अधिकारांबद्दल आशा आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक म्हणून तो वापरला जातो.

महिला दिनाचे महत्त्व:
हा दिवस महिलांना त्यांच्या हक्कांची आणि संधींची जाणीव करून देतो. महिलांना सक्षम बनविणे, त्यांचा आवाज उचलणे आणि समानतेसाठी लढा देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे. या दिवशी महिलांच्या समस्या आणि आव्हानांना समोर आणले जाते, जसे की लैंगिक समानता, शिक्षण, आरोग्य, आणि कामकाजी अधिकार. महिलांना त्यांच्या समान अधिकारांसाठी जागरूक करणे, त्यांच्या हक्कांची रक्षा करणे आणि कार्यक्षेत्रातील समानतेसाठी प्रयत्न करणे.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss