Wednesday, June 7, 2023

Latest Posts

योगसाधना करताना ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी, काही अनारोग्य असल्यास त्याच्या निवारणासाठी नियमितपणे योगसाधना करायला हवी.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी, काही अनारोग्य असल्यास त्याच्या निवारणासाठी नियमितपणे योगसाधना करायला हवी. हे सत्य आता बहुतेकांना पटलं आहे. मात्र तरीही अजूनही अनेकांनी योगसाधनेला आपल्या दिनक्रमाचा भाग बनवलेलं नाही. तुम्हीही यामध्ये मोडत असाल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून लवकरात लवकर योग्य साधना करण्यास सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या मनावरील टॅन हा नक्कीच कमी होण्यास मदत होईल. तसेच योगसाधना करताना अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावी लागते. त्या नेमक्या कोण कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.

 • कोणताही जुनाट आजार असल्यास किंवा एखाद्या दुखापतीतून सावरत असल्यास योगसाधना करण्यापूर्वी आपल्या फिजिशियनचा सल्ला अवश्य घ्या. योग शिकवणाऱ्या व्यक्तीस आपल्या या आजारा किंवा दुखापतीविषयी आवर्जून सांगा.
 • प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिचं सामर्थ्य, स्टॅमिना आणि लवचिकता यांची पातळी वेगवेगळी असते. शिवाय जीवनशैली आणि योग करण्याचा हेतूही असतो. तेव्हा आपल्याला योग्य ठरेल अशा योगासनांचा शोध घ्या आणि त्यांचा सराव करा.
 • योगासनं कधीही थेट जमिनीवर बसून किंवा उभं राहून करू नका. सपाट जमिनीवर योग मॅट, स्वच्छ चादर, टॉवेल इत्यादी अंथरूण, मग आसनं करा, योगसाधना किंवा ध्यानधारणा करताना शक्यतो नैसर्गिक हवा असायला हवी.
 • पंखा किंवा ए.सी.चा वापर टाळा. साधना करण्यासाठी स्वच्छ व निवांत जागा निवडा.
 • योगसाधना करताना सुती आणि सैल कपडे परिधान करा. रोज एक तास योगसाधनेसाठी द्या.
 • योगसाधना करण्यासाठी सकाळची वेळ अतिशय उत्तम मानली जाते. परंतु, त्या वेळी शक्य नसल्यास आपल्या सोयीनुसार कधीही योगासनं करता येतील.
 • पाणी प्यायल्यानंतर १५-२० मिनिटांनी, तसंच चहा-कॉफी घेतल्यानंतर अर्ध्या तासाने योगसाधनेला सुरुवात करा. जेवणानंतर चार तासांनी साधनेला प्रारंभ करा.
 • योगसाधना झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. अर्ध्या तासानंतर पाणी प्या.
 • योगसाधनेत श्वासाचं अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही आसनाच्या अंतिम स्थितीत डोळे मिटून ध्यानधारणा करा, म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करा.
 • योगसाधना हा स्पर्धेचा विषय नाही, त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आसनं करा. हळूहळू सरावाने अंतिम स्थिती गाठण्याचा प्रयत्न करा.

 • योगसाधना करताना सगळ्या चिंता सोडून साधनेत रममाण होण्याचा प्रयत्न करा.
 • सुरुवातीला आसनाची एखादी पायरी नाही जमली, तरी खट्ट होऊ नका. सरावाने सर्व काही जमतं, हे लक्षात ठेवा,
 • योगासनातील अंतिम स्थिती गाठण्यासाठी घाई किंवा अट्टहास करू नका.
 • आसन सोडतानाही घाई करू नका. हळुवारपणे पूर्वस्थितीत या.
 • प्रत्येक आसनानंतर थोडी विश्रांती घ्या.
 • योग्य ज्ञान किंवा मार्गदर्शक असल्याशिवाय योगसाधना स्वतःच्या मनाने करू नका.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss