Thursday, April 25, 2024

Latest Posts

गायीच्या दुधाला पर्यायी म्हणून हे दुधाचे प्रकार वापरू शकता; जाणून घ्या सविस्तर

आपल्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचे महत्व प्रचंड आहे. लहान मुलं अगदी जन्मल्यापासून दुधाचे सेवन करतो. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. दुधाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात.

आपल्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचे महत्व प्रचंड आहे. लहान मुलं अगदी जन्मल्यापासून दुधाचे सेवन करतो. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. दुधाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात. दुधामुळे आपली हाडे मजबूत होतात, आपल्याला ऊर्जा मिळते तसेच दूध आपल्या त्वचेसाठी देखील दूध फायदेशीर ठरते. आपल्याकडे गाय, म्हैस यांच्या दुधाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र अनेकांना दुधाचा त्रास होतो. दूध पचण्यास जड असते. त्यामुळे दुधाचे सेवन केल्याने काही जणांना त्रासाला सामोरे जावे लागते. शिवाय आपल्या अन्नातील प्रमुख प्रकारांमध्ये वेगन (Vegan) या प्रकारचा सुद्धा समावेश झाला आहे. बहुतांश लोक हे वेगन असतात. वेगन असलेले लोक गाय, म्हैस किंवा कोणत्याच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करत नाहीत. अशा लोकांसाठी दुधाचे इतर प्रकार उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया दुधाच्या प्रकाराविषयी.

बदामाचे दूध (Almond milk)

बदाम आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. बदामाचे दररोज सेवन केल्याने आपली बुद्धी तल्लख बनते. त्याचप्रमाणे आपली स्मरणशक्ती वाढते. बदामापासून दूध तयार करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि दुसऱ्यादिवशी भिजविलेले बदाम एका कपड्यात घेऊन व्यवस्थित घालून घ्यावे. अशाप्रकारे तुम्ही बदामापासून दूध तयार करू शकता.

काजूचे दूध (Cashew milk)

काजूचे दूध आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. काजूच्या दुधाला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. काजूच्या दुधात कॅलरीजचे प्रमाण कमी असते त्यामुळे या दुधाचे सेवन बरेच लोक करतात.

तांदळाचे दूध (Rice Milk)

राईस मिल्क चा वापर बरेच लोक करतात. गायीच्या दुधाला उत्तम पर्यायी दूध म्हणून राईस मिल्कचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. राईस मिल्क आपल्या शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे. राईस मिल्कपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी मिळते.

नारळाचे दूध (Coconut milk)

नारळाचे दूध आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे. नारळाच्या दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते म्हणून वजन करण्यासाठी या दुधाचा वापर केला जातो.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

हॉटेल स्टाईल Chicken kathi roll बनविण्यासाठी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss