सध्या चोरीच्या अनेक घटना घडतांना पाहायला मिळत आहेत. त्यात आता एक अजब चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका वेगळ्याच गोष्टीची चोरी करण्यात आली आहे. सगळ्या गोष्टींची चोरी करता येते, पण शिक्षणाची आणि ज्ञानाची चोरी करता येत नाही. असे असले तरीही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पीएचडी (PHD) ची चोरी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यपाल कुलपती रमेश बैस यांनी या पीएचडीचे (PHD) संशोधन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कॉपी-पेस्ट’ केलेली पीएचडी (PHD) रद्द करण्यात आली आहे. किशोर निवृत्ती धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात ५१ ते ६५ टक्के आशय ‘कॉपी-पेस्ट’ (COPY-PASTE) केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात किशोर निवृत्ती धावे यांनी १० वर्षांपूर्वी पीएचडी (PHD) पदवी प्राप्त केली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासीसाठींच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची अंमलबजावणी’ या विषयांतर्गत त्यांनी २०१३ मध्ये पी.एच.डी. प्राप्त झाली. सदर शोध प्रबंधात वाड्मयाची चोरी करण्यात आली असल्याची तक्रार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोध प्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनुसार डॉ. धर्मराज वीर, डॉ. शुजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली.
हे ही वाचा :
वनिता खरातने दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोवर, हेमांगी कवीची मजेशीर कमेंट
पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस अडवून परत पाठवल्या – आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक