बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच आता परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे.या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर या सरपंचाच नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून तपस करत आहेत. अज्ञात टिप्पर चालक घटना स्थळावरून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडमधील गुन्हेगारी, दहशत, खंडणीचे प्रकार राज्यभर गाजत आहेतच.त्यात आता ह्या नव्या अपघाताची भर पडली आहे. त्यामुळे हा बीड आहे की बिहार आहे, असा सवाल विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदार देखील प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीशी संबंधित एका वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यातील एक मोठी गँगच हे काम करत असल्याचा दावा सातत्याने होत आहे. त्यात आता परळी येथील औष्णिक केंद्रातील राखेतून कोट्यवधींची उलाढाल समोर आणण्यात आली होती.त्यामुळे आता नक्की आहे अपघात कि घातपात असे म्हटले जात आहे.
सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांची राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मिरवड फाट्यावर दुचाकीला धडक देऊन शनिवारी उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सरपंचाची दुचाकी पार चेंदामेंदा झाली आहे.रात्री त्यांच्या शेतातून ते घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली.या अपघातात सरपंच अभिमून्य क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तर आता या अपघाताने पुन्हा खळबळ उडाली आहे.हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर परळीतील राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पवनचक्की चर्चेत आली होती. परिसरातील ८ ते 9९ गावांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. शेतातील पिकांसह ओढ्यातील पाणी सुद्धा राखमय झाले आहे. त्याविरोधात काही सरपंचांनी विरोध केला होता.त्यातुन हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
हे ही वाचा:
Manikarao Kokate यांच्याकडून छगन भुजबळांबद्दल शांततेची भूमिका; म्हणाले, ‘तो’ विषय संपला…