spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

१२ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत धक्कादायक घटना

नुकतीच पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका १२ वर्षीय चिमुरड्या मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसराचे खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपीना अटक केली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते, 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला, पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणारे पाचही आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. सध्या जोगेश्वरी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून पुढील तपास करत आहेत. पिडीत चिमुकलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक सुरू आहे.

नेमकं काय घडलं?
पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकाबरोबर राहते. 24 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.त्यानंतर 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. यावरून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो ) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं

Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss