spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

१९ वर्षीय नराधमाचे ३६ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मांग; नकारानंतर भयंकर कटरने वार; तब्बल २८० टाके

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली. एका २६ वर्षाच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या १९ वर्षाच्या तरुणाने नाकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले. त्यातून सव्वादोन फुटांचा एका वार तर मानेपासून मंदीच्या खालपर्यंत आहे. महिलेला तब्बल २८० टाके लागले आहेत. महिला एका खासगी रुग्णालयात मारणयातनेपेक्षा भयंकर वेदना सहन करीत एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर आरोपी संपूर्ण गावात काही घडलेच नाही अश्या आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप केल्यासारखं काही दिसत नव्हते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचा नाव अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19, रा. घारदोन) असं आहे. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ३६ वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरु केल्याने तिच्यावरती वार केले आहेत. तिच्या चेहराही विद्रुप करत जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?
महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. महिलेनं फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्यानं वेणी खेचली आणि डोके दगडावर आपटलं. महिलेला काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला, अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं
पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, तिला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा येतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणते.

उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत
भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी 19 वर्षांच्या तरुणाने केली. तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना 11 वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत.

हे ही वाचा:

‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं

Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss