Wednesday, April 24, 2024

Latest Posts

राज्यात २ भीषण अपघातांची नोंद, लग्नावरुन परतताना Amravati जवळ अपघात, ५ जणांचा मृत्यू

अमरावतीजवळ देखील एक भीषण अपघात झाला आहे. या आपघातात तर एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू हा झाला आहे.

सध्या संपूर्ण राज्यात अपघाताचे सत्र हे सुरुच आहे. अनेक ठिकाणी मोठं मोठे अपघात हे होत आहेत. असाच एक अपघात नागपूर-पुणे महामार्गावर देखील आहे. आज एकीकडे नागपूर-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे आणि या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत तर दुसरीकडे अमरावतीजवळ देखील एक भीषण अपघात झाला आहे. या आपघातात तर एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू हा झाला आहे.

आज राज्यात तब्बल २ अपघातांची नोंद हि झाली आहे. हे दोन्ही अपघातात इतके भीषण होते की जागीच नागरिक हे ठार झाले आहेत. अरावतीमध्ये दर्यापूर – अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एकाच कुटुंबातील १२ जण लग्नासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव – सुरजी येथे गेले होते.

आयसर ट्रक आणि टाटा एस गाडी अश्या या दोन गाड्यांमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच ५ मृत्यू झालेल्या लोकांमध्ये २ लहान मुले २ महिला एका पुरुषांचा समावेश आहे. घटनास्थळी खल्लार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

तर दुसरीकडे नागपूर-पुणे महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावा जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात भीषण होता की या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ८ पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही एसटी संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे.

हे ही वाचा : 

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss