Maharashtra ST Scam: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर याच काळात संबंधित कंपन्यांना करार पत्र देण्याचे उघडकीस आले. त्याच्याबरोबर दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. राज्य परिवहन मंडळाने १३१० एसटी बस भाडेतत्त्वावर देताना व्यवहारात ठेकेदारावर मेहेरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या प्रकरणाबाबत स्थगिती दिली असून या पूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला सुमारे २००० कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे.
दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा उघड
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाने १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा दाखल केली होती. या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रत्येक विभागाला तीन समुहात विभागून प्रत्येक समूहात ४०० ते ४५० याप्रमाणे १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही असे सांगितले. महामंडळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही. प्रवाशांच्या हिताचा आणि फायद्याचा निर्णय घेतला जाणार. यात तडजोड होणार नाही असेही त्यांनी वृत्त समूहाला सांगितले.
सरकारला अंधारात ठेऊन राज्य परिवहन मंडळाने १३१० बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय उघडकीस आला आहे. या व्यवहारात परिवहन मंडळाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियांमध्ये सात वर्षांसाठी या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने २००० कोटींचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार. आता या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
हे ही वाचा:
आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी बोलावलं; नेमकं बेडमध्ये काय घडतंय?
Santosh Deshmukh Murder Case : मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची मोठी अपडेट; CID घेणार दखल