विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojanan) गेमचेंज असून र ठरलेली अतिशय चर्चेत आहे. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातीस महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरन २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीलाही विधानसभेत झाला. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं. एकीकडे विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. तस विधानसभा निवडणुकीत जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता कधी होणार, २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याची राज्यातील महिलांना उत्सुकता होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केले असून त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात २१०० रुपये कधी जमा होतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?