spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक -दुचाकीच्या भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

नागपुरात एका ट्रकने दुचाकी मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास गुंमगाव मार्गावर घडला आहे. तीन जिवलग मित्र जेवणाचा डबा घेऊन मोटारसायकलने जात होते.

हिंगण्याकडे येत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. आर्यन हुकूमचंद पालिवाल( वय 23),सुमेध उर्फ सुमित राहुल सिरसाट (वय 17) अशी मृतांची नवे आहेत. तर अरमान रवींद्र मडामे (वय १७) हा गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही मोटरसायकल स्वार महाजनवाडी, वानाडोंगरी हिंगणा रोड नागपूर येथील रहिवासी आहेत.

चंद्रपुरात भीषण अपघात, आजी-आजोबासह नातीचा मृत्यू

दरम्यान, चंद्रपुरात देखील अशीच एक घटना घडली आहे. या अपघातात आजी-आजोबा सह नातीचा मृत्यू झालाय. हि घटना भद्रावती शहराजवळील डाली पेट्रोल पंप येथील यु-टर्न जवळ घडलीये. मंजुषा नागपुरे (वय 47 वर्षे), सतीश नागपुरे (51) आणि माहिरा नागपुरे (2) अशी मृत व्यक्तींची नावे आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या रासाघोणसा येथील हे सर्वजण भद्रावती येथे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात मंजुषा नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सतीश नागपुरे आणि माहिरा नागपुरे यांना उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss