दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत. मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होत असतात. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो.
गोविंदांना राज्य सरकारचे विम्याची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम सरकारने मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत.शासकीय आदेश काढून राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले आहे. अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिले आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आता ७५ हजार गोविंदाना सरकारने शासकीय विमा कवच दिले आहे.प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले. प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जख्मी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.
अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यंदाही मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ११ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याच्या आतच कार्यवाही पूर्ण झाली आणि १८ ऑगस्ट रोजी गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याचा शासननिर्णय, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील क्रीडा विभागाने जारी केला.
हे ही वाचा:
ठाकरे कुटुंबियांवर चढवला नितेश राणेंनी हल्लाबोल
सुनील राऊतांनी केला खळबळजनक दावा