छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे, निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेस च्या संचालकांनी गुंतवणूकदारांची तब्बल दिड कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एल एफ एस ब्रोकिंग नावाच्या कंपनीच्या संचालकांनी जास्त परताव्याची आमिष दाखवले होते. त्यामुळे निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेस माध्यमातून शेकडो गुंतवणूक दरानी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, परंतु या कंपनी कडून अद्याप कुठलाही परतावा मिळालेला नसल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच सुभाष भास्कर तौर या युवकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या युवकासह आणखी २४ जणांची जवळपास १,४४,५०,००० रुपयांची फसवणूक केली गेली आहे त्याच्या तक्रारिची आर्थिक गुन्हे शाखेने दखल घेत वेदांत नगर पोलीस ठाण्यात एल एफ एस ब्रोकिंग या कंपनीच्या जबाबदार व्यक्ती म्हणून जियापूर रहेमान राहणार वेस्ट बंगाल,सोनल भक्ता राहणार गुजरात, सौमित्र सिन्हा,सौरव अधिकारी, सेजल मॅगजी देसर चंद्रा, दिलीपकुमार मैती, तर या कंपनीत महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत असलेल्या विनोद बाळासाहेब माने व निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेसचा ब्रांच हेड विनोद त्रिंबक साळवे यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणात आणखी ७०० ते ८०० गुंतवणूकदारांची गुंतवणूक केली असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
Follow Us