मुंबईतील दिंडोशी पोलीस सशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका २० वर्षाच्या युवकाने ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा समोर आलं आहे. वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार आहे. त्याचाच फायदा घेत युवकाने तिच्यावर अत्याचार केला. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा नाव प्रकाश मोरिया असं आहे.
वृद्ध महिला घरी एकटीच होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला ही घरात एकटीच होती. या महिलेला डिमेंशिया आणि मेमरी लॉसचा आजार आहे. त्यामुळे तिच्या घरी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. महिलेला एकटी असल्याचं पाहून आरोपी घरात शिरला. त्यावेळी महिला तिच्या रुममध्ये झोपली होती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
सीसीटीव्हीमुळे घडलेला प्रकार उघडकीस
घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपीच्या शोधात पोलिसांची टीम रवाना करण्याात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :