आज ३० जानेवारीला बीड जिल्ह्यात पालक मंत्री अजित पवार यांच्या नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशन करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यामधून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुदंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सदस्य समिती मधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके याना वगळण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे सातत्याने वाल्मिक खरड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करत होते म्हणून त्यांना वगळण्यात आले अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देश सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजमधील नमिता मुदंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता या निर्णयाचे महायुतीत काही पडसाद उमटणार का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातील परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा रोखटोक इशारा दिला. जे लोक चुकीचे काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सातत्याने गुन्हा करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल. तर रिव्हॉल्वर दाखवून रीळ तयार करणाऱ्यांचे लायसन्स रद्द केले जाईल असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
हे ही वाचा :