नाशिक नगरी ही गुन्हेगारी नगरी म्हणून ओळखली जात आहे. २४ ऑगस्ट २०२३ रोजी नाशिक जिह्ल्यात एका तरुणाच्या खुनाची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच २६ ऑगस्ट २०२३ नाशिक मधील सातपूरा येथे एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. त्यांनर त्याने जखमी अवस्थेत मित्राला खाजगी रुग्णालयात दाखल केले . पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण पोलिसांना या घटनेचा संशय आल्यामुळे त्यांनी या घटनेचा तपास करायला सुरुवात केली पण तपासात हा खून असल्याचे समोर आले.
नाशिक शहरात दिवसेंदिवस भर रस्त्यात खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सर्व घटनांमुळे नाशिक शहराला क्राईम सिटी म्हणून ओळखले जात आहे. दोन दिवसापूर्वी बाजारातील संदीप आठवले या भाजी विक्रेत्याचा भर चौकात खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर नाशिक पोलिसांचा कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उठवण्यात आला आहे. कार्बन नाका परिसरात शनिवारी रात्री एक खुनाची घटना घडली. दारू पिल्यानंतर झालेल्या छोट्या वादावरून विश्वनाथ सोनवणे या २७ वर्षीय मित्रावर चाकूने सपासप वार करून खून केला.
त्यानंतर पोलीस कारवाईचा भीतीने विश्वनाथ यांस जखमी अवस्थेत बाईक वर बसवून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. विशवनाथ याचा अपघात झाला असे त्यांनी डॉक्टरना भासवले. पण डॉक्टरांनी विशवनाथ याला जिल्हा रुग्णालयात घेऊ जाण्यास सांगितले. रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान असे दिसून आले की, त्याचा अंगावर चाकूचे वार स्प्ष्ट दिसत आहेत, त्यामुळे हा अपघात नसून हा खून आहे असे पोलिसानांचा निदर्शनास आले. त्याच्यानंतर पोलिसांनी मित्रांची कसून चौकशी केली आणि त्यांनी गुन्हा काबुल केला. नाशिक शहरात गल्लोगल्ली भाईगिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. सोशल मीडियावरील ही टोळी आत्ता रस्त्यावर येऊ लागली आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी कुठे तरी थांबली पाहिजे असे सर्व नागरिकांचे मत आहे.
हे ही वाचा:
Amit Thackeray यांनी दिला सरकारला इशारा, शेवटचं सांगतोय….
MNS च्या जागर यात्रेत कोकणकन्या Ankita Walawalkar ने लावली हजेरी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.