Students Update : या आधुनिक शिक्षण काळाच्या क्षेत्रात जगभरात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असतात अश्यातच भारत सरकारने आता विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चॅटबॉट वापरण्याची योजना आणली आहे. या आधुनिक काळाच्या क्षेत्रात पायाभूत चाचणी, संकलित चाचणी अशा अनेक चाचण्यांसाठी या चॅटबॉटचा वापर करता येईल. यातून शिक्षणाचे काम हलके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामुळे काम वाढणार असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अशा नोंदी कश्या जपायच्या हाही प्रश्न उद्भवत आहे.
भारत सरकारकडून शिक्षकांचे काम सोपे करण्यासाठी स्विफ्ट चॅट हे चॅटबॉट लागू झाले होते. हा चॅटबॉट तुम्ही शाळेव्यतिरिक्त तुमच्या घरी किंवा इतर ठिकाणी असाल तर मोबाईलवर देखील वापरू शकता. याआधी शिक्षकांना या चॅटबॉटवर विविध चाचण्या व परीक्षांचे गुण नोंदवण्यास सुचवण्यात आले होते. या चॅटबॉटमध्ये काही नवीन फीचर टाकली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.
स्विफ्ट चॅट ॲप मध्ये कसे लॉग इन करायचे?
स्विफ्टचैट प्लैटफॉर्मवर प्रथम बार लॉग इन करण्यासाठी भारतामध्ये वैध 10-अंकीय फोन नंबरची आवश्यकता आहे. त्यानंतर मोबाईल वर त्याचा OTP मेसेजद्वारे येईल तो OTP टाकून तपासणी प्रक्रिया पार पडेल.
वापरकर्त्यांसाठी स्विफ्टचॅट प्लॅटफॉर्म एका सुपर-अॅपप्रमाणे तयार केले आहे.
अँड्रॉइड अॅप्लिकेशन – मोठ्या संख्येने अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आवृत्त्यांशी सुसंगत आहे.
प्रोग्रेसिव्ह वेब अॅप्लिकेशन (PWA) – एक वेब-आधारित आवृत्ती जी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवरील (iOS, Windows, macOS, Linux, Android) वेब ब्राउझरवर अॅक्सेस करता येते.
भारत सरकारसह राज्य सरकारही शिक्षकांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी, शाळेचा यूडायस क्रमांक या चॅटबॉटशी जोडून ही हजेरी घेतली जाईल.वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांसमोर ‘हजर’ असेच नोंदवलेले जाईल. शिक्षकाला फक्त गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद त्या बॉटवर करायची आहे असे त्या स्विफ्टचॅटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
Follow Us