बुलढाण्यात नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय प्रज्वल पाटील (Prajwal Patil) याने स्वतः पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकारद्वारे आयोजित, एक फेब्रुवारीपासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे.
चिखली शहरात राहणाऱ्या १४ वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची आवड असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ, कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तके आणि इतर पुस्तकांचे वाचन केले आहे. त्यानंतर त्याला लिहिण्याचीही आवड निर्माण झाली आणि त्याने “VICTORY’S HIDDEN DEFEAT” अर्थात “विजयात दडलेला पराभव” हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. १ फेब्रुवारीपासून भारत मंडपम् दिली येथे भारत सरकार द्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या मुलाने अभ्यास करावा चांगले गुण मिळवावे यासाठी अनेक पालक आपल्या मुलांकडे आग्रह धरतात, तर दुसरीकडे अनेक मुलं सोशल मिडियाच्या आहारी गेले आहेत, असे असताना आपल्या मुलाने एवढ्या कमी वयात पुस्तक लिहावं आणि त्याच्या पहिल्याच पुस्तकाचा जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश झाला याचा प्रज्वलच्या आई-वडिलांनाही मोठा अभिमान आणि कौतुक वाटतं आहे. सोशल मिडिया आणि रिल्सच्या जमान्यात पुस्तक वाचनाची सवय कमी झाली आहे, मात्र प्रज्वलने कमी वयात वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे.
हे ही वाचा :