spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

गृहनिर्माण धोरणासंदर्भात Eknath Shinde यांच्याकडून कामांचा धडाका

गृहनिर्माण विभागाकडून आज ३ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आले तर गृहनिर्माण विभागाकडून गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

गृहनिर्माण विभागाकडून आज ३ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आले तर गृहनिर्माण विभागाकडून गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारे रेंटल हौसिंग तसेच गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणीचं टार्गेट यासंदर्भांत आज गृहनिर्माण विभागाकडून सादरीकरण करण्यात आलं. पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण तयार होणार आहे.

गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधणीचं टार्गेट ठेवण्यात आलं. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा निर्णय होणार आहे. जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. त्यांना तिथेच घरं देता येतील का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाला दिले आहेत.

आज झालेल्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाईडचा वापर करण्यात आला. यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला, व मराठी स्लाईडबाबत विचारणार केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, हे लक्षात आहेत ना? अशी विचारणा उपमुख्यमंत्री यांनी हसत हसत केली. त्यानंतर लगेचच मराठी स्लाईड पडद्यावर आली. २००७ नंतर गृहनिर्माण धोरणच तयार झालं नव्हतं, ते आता करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss