spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार थांबवली आणि अश्लील चाळे केले

नुकताच पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडली. काही दिवसांपूर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यासह देशभरात झाली. आता मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरुणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मध्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नेमके काय प्रकरण?

तरुणांनी दारूच्या नशेत भर रस्त्यात आपली BMW गाडी उभी केली आणि अश्लील चाळे केले. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. सिग्नलवरती BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

Latest Posts

Don't Miss