गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. संत कबिरनगर येथे शनिवारी रात्री एका व्यक्तीची धारधार शास्त्राने हत्या करण्यात आली आहे. अरुण बंडी असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बंडी याचे काही युवकांसोबत जुने वाद होते. त्याला शनिवारी रात्री चार जणांच्या टोळक्याने अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दंगा पथक तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मारेकरी सराईत गुन्हेगार
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर पोलिसांनी रात्री दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मारेकरी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.