साहित्य पुरवणाऱ्या टोळीतील तब्बल ३३ जणांना अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख सूत्रधार संजय गुप्ता आणि मोनीश गुप्ता हे देखील पोलिसांच्या अटकेत आहे. अकोल्यातल्या येवता आणि कातखेड रस्त्यावरील एका गोदामात ही टोळी क्रिकेट खेळावर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारे ID तयार करीत होती. या टोळीच्या ३३ लोकांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
दरम्यान, टोळीने ५४ बँकेचे खाते विविध बँकेत उघडले होते. अनेक दिवसांपासून अकोल्यात ही टोळी कार्यरत होती. अखेर आज अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश केलाय. दरम्यान, गुजरात राज्यातील ६, उत्तर प्रदेश येथील ३, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी १ आणि महाराष्टातील चंद्रपूर, पूणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील ८ आणि अकोला जिल्ह्यातील १४ असे हे आरोपी आहेत.
यातील टोळी Webapp चा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनोगेम, पेड ऑनलाईन गेम, इत्यादी खेळावर व्हॅट्सअप, टेलीग्राम ईत्यादी सोशल मिडीया ग्रुपवर जाहिरात करायची. ग्राहकाकडून ऑनलाईन पैसे घेत त्यांची आयडी बनवुन पैश्याप्रमाणे Web ID बनवायची. सट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवान-घेवान करत असल्याचे दिसून आले. तर त्यांच्याकडून एकुण १२ Laptop, ११३ मोबाईल, १० बँकेचे Passbook, २ पासपोर्ट, १३ ATM कार्ड, Internet Router Airtel, jio चे १२ राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहीत्य जप्त करण्यात आले आहे. तर ज्या ठिकाणी हा गोरखदंधा चालत होता, तो रविंद्र विष्णुपत पांडे याने संजय गुप्ता आणि मोनीश गुप्ता यांना उपलब्ध करून दिला होता. मोनिश निरंजन गुप्ता आणि संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिककर याच्या माध्यमातुन अटक आरोपीची टोळी जमवून आरोपीला Mobile, Laptop, Wifi, ची सुविधा तसेच बोगस बैंक अकाउंट उपलब्ध करून दिले होते.