प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन अशा दक्षिण मुंबईतील मलबार टेकडीच्या पश्चिम किनारपट्टी वर स्वयं प्रभू श्रीराम ह्यांनी स्वहस्ते स्थापित श्री वाळूकेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे.. त्याचं मंदिराच्या समोर एक विस्तीर्ण गोड्या पाण्याचे कुंड आहे जिथे सतत निरंतर तिन्ही त्रिकाळ गोमुखातून शुद्ध निर्मळ जलस्रोत वाहत असतो, त्या प्रचंड डोहाला पवित्र” बाण गंगा” असे समजले जाते. सदर बाणगंगा तलावाच्या सभोवताली शेकडो देवतांची मंदिरे आहेत.. मुंबईतील लाखो भाविक येथे दर्शनाला आणि पित्रांचे उत्तरकार्य करायला येतात इतके महत्त्व आणि पावित्र्य ह्या स्थानाचे आहे. गौड सारस्वत ब्राम्हण टेम्पल ट्रस्ट गेली सुमारे 11 वर्षे ह्या तीर्थ क्षेत्राचे महत्त्व लोकांना समजावे म्हणून दर वर्षी दिवाळी नंतर येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी सुद्धा संबोधले जाते, एका भव्य महाआरतीचे आयोजन करत आले आहेत. “बाणगंगा महाआरती” म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ह्या नयनरम्य सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. गेल्या वर्षी म्हणजे 2023 रोजी अचानक पाऊस येऊन देखील 5000 ते 7000 भाविकांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. ह्यावर्षी भाविकांच्या संख्येत नक्कीच वृद्धी होईल ह्यात शंका नाही.
यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जरी हा सोहळा होत असला तरी, मुंबई पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, बेस्ट विद्युत पुरवठा खाते आणी स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी लाभते.. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनाची काटेकोरपणे काळजी घेतली जाणार आहे, त्यात मुंबई जल सुरक्षा दलाचे 40 जलरक्षक (Divers) 80 च्या वर खाजगी सुरक्षा जवान आणि 100 च्या वर ट्रस्टचे स्वयंसेवक कार्यक्रम सुयोग्य पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहेत. भाविकांच्या प्रवेश आणी निर्गमन व्यवस्था चोख नियोजन बद्ध होणार आहे. सर्व बाबतीत विचार करून योग्य त्या गोष्टी साठी विशेष लक्ष देऊन काळजी घेण्यात आली आहे. आपल्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता, वाळकेश्वर, मलबार हिल येथे होणाऱ्या “बाण गंगा महाआरती” साठी मुंबईतील सर्व भाविकांना हार्दिक निमंत्रण देत असल्याची माहिती मानद सचिव शशांक गुळगुळे यांनी दिली. आज सायंकाळी बाणगंगा महाआरती टाईम महाराष्ट्रच्या युट्युब चॅनेलवरून प्रक्षेपित केली जाणार आहे, यामुळे भाविकांना ऑनलाईनरीत्या आरतीचा लाभ घेता येणार आहे.
हे ही वाचा:
सिंधुदुर्गात नाईक विरूध्द राणे यांच्यात परंपरागत संघर्ष, कोकणी माणूस मात्र शांत | Narayan Rane
MNS Avinash Jadhav Exclusive Interview : भाजपच्या विद्यमान आमदारांना अनेक सोसायट्यांत नो एन्ट्री