माणूस म्हणून जगताना लाज वाटावी अशा काही घटना राज्यात घडतायत. मुंबईतली बदलापूरची घटना असो की मग कोलकात्यात डॉक्टर मुलीवर झालेला अत्याचार असो, नुकत्याच घडलेल्या दोन घटनेनं काळीज पिळवटून जाव अस. कृत्य नराधमांनी मुलीसोबत केलं. आईकडे खाऊसाठी हट्ट धरुन २० रुपये घेवून गेलेली मुलगी घरी परत आलीच नाही. आठ दहा तास वाट बघून मुलगी घरी आली नाही म्हणून आई बापांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि समोर आली धक्कादायक घटना काय घडल पाहूयात. कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर दोन जणांनी बलात्कार करुन खून केला. या घटनेनं पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
गेल्या काही वर्षात देशभरात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर वाढते आत्याचार पाहता महिला सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे,नुकतीच कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार करून हत्या केल्याची घटना ताजी असताना. मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आली आणि महिला, मुलींच्या सुरक्षेवरून स्थानिक नागरिकांना आपला संताप अनावर झाला. या घटना खूप धक्कादायक होत्या. या घटना आपण विसरू शकलो नाही आणि आता पुन्हा कल्याण मधून अशीच एक घटना समोर येत आहे. चला बघुयात काय आहे संपूर्ण प्रकरण.
कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारी 13 वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी आईकडून वीस रुपये घेऊन दुकानात गेली. पण ती घरी परतलीच नाही. आठ-नऊ तास होऊनही मुलगी घरी न आल्यानं पीडितेच्या कुटुंबीयांनी कल्याणमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी कल्याणजवळच्या भिवंडी परिसरात बापगावमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. कोळसेवाडी पोलिसांनाही याची माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या वडिलांसह बापगाव गाठलं. अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवला असता वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं. मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या कशी करण्यात आली, याची माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दोन जणांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विशाल गवळी आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीच्या पत्नीला बुलढाण्यातील शेगावमधून अटक करण्यात आली आहे. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिल्याचे निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदपेक्षाही वरचढ असल्याचे समोर आलं आहे. विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. विशाल गवळीने याआधी क्लासवरुन घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत असून काही कुटुंब परिसर सोडून निघून गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली आहे. दाखल गुन्ह्यांमधील फिर्यादींना दमदाटी करुन ते मागे घेण्यास भाग पाडतो अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्याच्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात संतापाची लाट पसरली असून, आज नागरिकांनी तोंडावर काळ्या फिती लावून मोर्चा काढत निषेध नोंदवला. बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणेच या आरोपीलाही धडा शिकवावा अशी मागणी केली आहे. नेत्यांच्या ताकदीमुळे तो सुटतो, पण त्याला फाशी द्या अशी मागणी जनतेने केली आहे.
काही महिन्यांपूर्वीही याच मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती, त्यावेळी कोळसेवाडी पोलिसांनी याबाबत कारवाई केली होती, मात्र या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणात आधीच्या घटनेशी संबंधित लोकांचा समावेश आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.