spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

माजी खासदार Gajanan Kirtikar यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; 82 व्या वर्षी पत्नीने घेतला अखेरचा श्वास

शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्‍या पत्‍नी मेघना गजानन कीर्तिकर (Meghna Kirtikar passed away) यांचे आज अल्पश: आजाराने निधन झाले.त्या ८२ वर्षांचा होत्या. आज रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्‍मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर (Meghna Kirtikar passed away) या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी ४ ते ६ या दरम्यान अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यानंतर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार होतील.(Meghna Kirtikar passed away)

एकाच घरात दोन गट

काही वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. यामध्ये उद्धव ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट पडले. यामध्ये कीर्तीकर कुटुंबामध्ये देखील दोन राजकीय गट पडल्याचे दिसून आले होते. गजानन किर्तीकर हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. पण गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला आणि ते शिंदे गटामध्ये सामील झाले. तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्यामुळे कीर्तीकर कुटुंबामध्ये राजकीय दोन गट पडल्याचे दिसून आले होते. अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवले होते. अमोल कीर्तिकर हे उद्धव गटाच्या शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागेचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे (शिवसेना) उमेदवार रवींद्र वायकर यांनी चुरशीची लढत दिली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. यामुळे अमोल कीर्तीकर यांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. अमोल कीर्तीकर यांना मातृशोक झाला असून त्यांच्या आई मेघना कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.

Latest Posts

Don't Miss