पुण्यातील भोर – महाड मार्गावर वरंध घाटात भीषण अपघात झाला आहे. वरंध घाटात शंभर फूट खोल दरीत इको कर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शुंभम शिर्के (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत घडली. महाडहोऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमचा सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघात नेमका कशामुळे झाला याचा भोर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय झालं ?
भोर महाड मार्गावरील वरंध घाटात इको कार महाडहून भोरच्या दिशेने जात होती. घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून इतर 8 जण गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. जखमींना तात्काळ बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले आणि अपघाताची माहिती घेत तपास सुरू केला आहे.
अपघातात शुभम शिर्के (वय 22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मंगेश गुजर (वय 26), आशिष गायकवाड (वय 29), सिद्धार्थ गंधणे (वय 26), सौरभ महादे (वय 22), गणेश लवंडे (वय 27), अमोल रेकीणरं (वय 27), यशराज चंद्र (वय 22) आणि आकाश आडकर (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता