spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! एक ठार तर १५-२० जखमी

महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत कारण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कार्यवाही केली. अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु आहे. यातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले झट असून, पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अपघात ट्रक आणि बसच्या वेगाच्या तफावतीमुळे झाला असावा. या अपघाताने पुणे-सोलापूर महामार्गावर सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

पुणे शहरातील वाघोली केसनंद परिसरामध्ये रविवारी रात्री भीषण अपघात झाला होता. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या ९ जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांची फुटीपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ९ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांना मुत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. हि घटना ताजी असतानाच वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीत ⁠हायवा डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ⁠साईराज देशमुख असे या जखमीचे नाव आहे. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर या ठिकाणी अपघात झाला. काल वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरने नऊ जणांना चिरडल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झालाय. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाघोलीमध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अपघाताप्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss