राज्यभरात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. पण त्यावर सुद्धा मात करून शेतकरी शेतात पीक घेतात. या संकटनाचा सामना करत कोकणातील एका शेतकऱ्याने बाबूंची यशश्वीरित्या शेती केली आहे. कोकणात प्रामुख्यने तांदूळ, काजू , आंबा या पिकानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या सर्व पिकांना मागे टाकत एका शेतकऱ्याने बांबूंची शेती केली आहे. त्याचा हा प्रयोग यशश्वी झाला आहे. मागील पाच वर्षपूर्वी केलेल्या बांबूंच्या शेती मधून ते वर्षला लाखो रुपये कमवतात.
रत्नागिरी (Ratnagiri) जिह्ल्यातील वासुदेव घाग हे भारतीय सैन्यात ट्रेनर म्हणून काम करत होते. वासुदेव घाग यांनी सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावी कोकणात शेती करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी शेतीची संपूर्ण माहिती आणि विचार करून आंबा आणि काजूची शेती न करता बांबूची शेती करण्याचा निर्णय घेतला. आता सध्या ते कोकणातील मूळ सौंदळ गावी डोंगरळ भागात बांबूंची शेती करत आहेत. त्यातून त्यांना वर्षला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पादन मिळते. बाबूच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यामागे वासुदेव घाग यांचा खूप मोठा संघर्ष आहे. या शेतीसाठी त्यांनी मुंबईतील घर विकलं. २०१८ साली त्यानी बाबूच्या लागवडीला सुरुवात केली. आता सध्या त्यांच्या शेतात ३००० हजार बांबूची बेट आहेत. त्यातून पंधरा ते वीस हजार बांबू तोडले जातात. त्यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होतो.
वासुदेव घाग यांनी डोंगराळ भागातील स्मशानाच्या बाजूला असलेली जवळपास दहा एकर जागा तीन लाख रुपये प्रति एकर अशा दराने विकत घेतली. पण त्याची ही जागा स्मशानाच्या बाजूला असल्यामुळे इथे बांबूची लागवड केली जाणार म्हणून लोकांनी त्यांना वेड्यात काढले पण त्यांनी त्या जागेवर यशश्वीपणे बांबूची शेती करून दाखवली आता लोक त्यांचे कौतुक करत आहेत. त्याच्या या यशामागे त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यानाची त्यांना साथ लाभली. पारंपरिक शेतीच्या मागे न जाता नियोजन करून त्यांनी ही बांबूची शेती यशश्वी करून दाखवली.
हे ही वाचा:
Jawan Movie, महेश भट्ट यांच्याकडून किंग खानचे काैतुक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची टीका