spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

अर्धनग्नावस्थेत सापडला एका महिलेचा मृतदेह… सुसाईड की हत्या?

मध्यप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आहे. हा प्रकरण सुसाईड आहे की हत्या? बघुयात

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भोपाळच्या अवधपुरी परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृत्यूदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. ती महिला इश्योरन्स कंपनीत मॅनेजर होती. मृत महिलेचा नाव नेहा विजयवर्गीय आहे. नेहाचा पोस्टमार्टम करण्यात आला आहे नंतर तिचा मृतदेह तिच्या राजगढ या गावी नेण्यात आला असून त्याच्यावर तिच्या नातेवाईकांनी अंत्य संस्कार केला आहे. आता पोलिसांचा लक्ष पोस्टमार्टेमचा अहवाल काय येतो याकडे लागले आहे. कारण तिचा मृतदेह संशयास्पद रित्या सापडला होता.

अवधपुरी येथील निर्मल पॅलेस येथील एका घरात नेहा विजयवर्गीय वय वर्ष 36 आहे. ही दुसऱ्या मजल्यावर रहात होती. नेहा नर्मदापुरम रोड येथे असलेल्या एका खाजगी इंश्योरन्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती.22 ऑक्टोबर रोजी नेहाची आई तिला कॉल करीत होती. परंतू नेहा फोन उचलत नव्हती. नेहाच्या आईने तिच्या फ्लॅटच्या खाली रहाणाऱ्या घरमालकाला यांसंदर्भात सांगत चौकशी करायला सांगितले. जेव्हा घरमालक नेहाच्या फ्लॅटजवळ गेला तेव्हा त्याला फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक असलेला आढळला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजवला आणि आवाज देऊन पाहीला मात्र दरवाजा काही केल्या उघडला गेला नसल्याचे त्याने अवधपुरी पोलिसांना या बाबत तक्रार केली. पोलिसांची टीम तेथे दाखल झाली आणि पोलिसांनी दरवाजा तोडला. आणि त्या फ्लॅटमध्ये त्यांना नेहा अर्धनग्नावस्थेत पडलेली आढळली.

नेहा अर्धनग्नावस्थे पोलिसांना पडलेली आढळली तिच्या तोंडातून फेस आलेला होता. तिथे उलटी झालेली दिसत होती. तिने विष खाऊन आत्महत्या केलेली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.परंतू फ्लॅटच्या आत कोणतीही बाटली किंवा विषारी पदार्थाचा रॅपर किंवा पाकिट सापडलेले नाही किंवा कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. तर मग हा प्रकरण सुसाईड आहे की हत्या? असा प्रश्न समोर येत आहे.त्यामुळे पोलीस आता पोस्टमार्टेमच्या अहवालाची वाट पाहात आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Latest Posts

Don't Miss