मृत्यू झालेली महिला अचानक जिवंत झाली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्यच वाटलं असेल. पण हे खरं आहे. महिलेचा मृत्यू झाला. तिच्या घरच्यांनी पंडितला बोलावलं, तिचे केस काढले, सर्व विधी केले आणि अंतिम संस्कारासाठी मृत्यूदेह घेऊन स्मशानात गेले आणि त्यावेळी चमत्कार घडला. अग्नी देणार आणि त्याआधी अचानक तिच्या शरीराची हालचाल सुरु असल्याचं दिसून आलं. त्यावेळी उपस्तिथ असलेले सगळेच जण घाबरले आणि सरणापासून लांब गेले. तेवढ्यात ६५ वर्षीय वृद्ध महिला अचानक उठून उभी झाली. हे दृश्य बघून उपस्तिथ असलेले लोग हैराण झाले. ही घटना तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये घडली आहे. महिला जिवंत असल्याचे बघून तिच्या कुटुंबियांना खुप आनंद झाला.
महिलेचं नाव चिन्नाम्मल (६५) आहे. ती आपल्या पती सोबत तामिळनाडूच्या करुमलाई सुरंगमपट्टी या गावात राहत होती. त्यांचा कुटुंबियातील सदसय त्यांच्या आसपास राहतात. १६ नोव्हेंबरला दुपारी जेवतांना तिची तबेत अचानक बिघडली. तिच्या पतीने अन्य सदस्यांच्या मदतीने तिला चिन्नाम्मला रुग्णालयात नेत्यांना रस्त्यात चिन्नाम्मलाची तब्येत जास्त बिघडली. तिच्या शरीराची हालचाल बंद झाली. कुटुंबीयांनी हाताची नास तपासली आणि नस बंद झाल्याचं समजलं. महिला श्वास घेत नव्हती. तिचा मृत्यू झालाय असं कुटुंबियांना वाटलं. म्हणून ते महिलेला परत घरी घेऊन आले आणि महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली.
कुटुंबीयांनी तिचे केस काढले. पंडित बोलावलं, सर्व विधी पूर्ण केले. मृत्यूदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले. चितेवर लाकडं ठेवण्यात आली. मृत्यदेह चितेवर ठेवण्यासाठी नातेवाईकांनी महिलेचा मृत्यदेह उचलला. तेव्हाच महिलेची हालचाल दिसून आली. तिने हात पाय हलवले. अचानक महिला उठून बसली. हे दृश्य पाहून कुटुंबीय घाबरले. आणि महिला सुद्धा चक्रावली. त्यानंतर लोकांनी तिला काय झालं ते सांगितलं. गावात या घटनेची चर्चा सुरु आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.