spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

एका तरुणाला गरम सळईने चटके देत हाल हाल करून संपवलं; धक्कादायक घटना

सोलापूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. पिलीव माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणाचा हाल हाल झालेला मृतदेह आढळून आला असून नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले. अश्या क्रूर पद्धतीने एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. पीडित आईने आर्त हाक देत माध्यमांसमोर बोलताना म्हंटले आहे, की आता माझ्या लेकाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांचेही तसेच हाल करून शिक्षा द्या. दरम्यान, पोलीस घटनेचा शोध घेत आहेत.

 

मृत तरुणाचा नाव आकाश अंकुश खुर्द असं आहे. तो आपल्या विधवा आई, पत्नी आणि सात महिन्याच्या मुलासह राहत होता. मंगळवारी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला. मात्र, पहाटे त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह फॉरेस्टमध्ये टाकण्यात आला होता. मृतदेहाशेजारीच त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती, त्याचा नग्न मृतदेहाशेजारी पडलेल्या त्याच्या कपड्यातून महत्वाचा पुरावा असणारा मोबाईल गायब झाला होता. सकाळी ग्रामस्थांना ही घटना माहिती पडताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी बोलणे टाळले
पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अद्याप अहवाल सादर झालेला नाही. मात्र, या संपूर्ण प्रकारावर पोलिसांनी बोलणे टाळत माध्यमांची भेटही टाळली आहे. या घटनेत मृत आकाशचा मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून यावर आलेले फोन कोणाचे होते, यावरून त्याच्या हत्येचा छडा लागू शकणार आहे. पण, त्याचा मोबाइलही गायब आहे.

तसंच हाल हाल करुन शिक्षा द्या
आकाशचा मृतदेह इतक्या भयानक अवस्थेत सापडल्याने कुटुंबीय देखील हादरुन गेले होते. आकाशच्या हत्येमुळे केवळ 7 महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई आता उघड्यावर पडले आहेत. घरातून गेलेल्या माझ्या मुलाचा थेट मृतदेहच घरात आला, माझ्या लेकास मारहाण करणाऱ्यांना देखील तसंच हाल हाल करुन शिक्षा द्या, अशी मागणी पीडित आईने केली आहे. दरम्यान, या क्रूर हत्येमागे नेमके कोण आहे? हे शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे. बीड, परभणीतील हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातही अश्याक्रूर रीतीने मारहाण आणि चटके देऊन हत्या झाल्याने सोलापूर जिल्हा देखील हादरून गेला आहे.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss