जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलक मराठा आरक्षणसाठी बसले होते. तेव्हा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला होता. या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. काही ठिकाणी जिल्हा बंद करण्यात आला तर काही ठिकाणी बस जाळण्यात आल्या. मराठा आरक्षणचा मुद्दा आता तापला आहे. तर नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाने आत्महत्या (Suicide) करुन जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुदर्शन देवराये असे आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात ही घटना घडली आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे. या घटनेनंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या गावात पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. मनोज जरांगे याना पाठींबा देण्यासाठी कामारी गावात १४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करण्यात आले होते. या उपोषणता सुदर्शन देवराये हा युवक सहभागी झाला होता. मात्र, आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शन अस्वस्थ होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. वेगवेगळ्या भागात उपोषण,मोर्चा, आंदोलन करण्यात येत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी सांगितले होते राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. रविवारी (१७ सप्टेंबर) देखील सांगलीत भव्य असा मोर्चा सकल मराठा समजाच्या वतीने काढण्यात आला होता. मराठा समजला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असून, तरुणांनी संयम ठेवावा असे आवाहन मनोज जरांगे यांनी यापूर्वीच अनेकदा केले आहेत.
हे ही वाचा:
आज होणार शिवसेनेच्या दोन मोठ्या याचिकांवर निर्णय
आज भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित जाणून घ्या काही खास गोष्टी…