Abu Azmi : राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यावरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबवर स्तुतीसुमने उधळली होती, औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे आझमी यांनी म्हटले होते. मात्र आता माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्ला अलेह बद्दल जे इतिहासकार आणि लेखक म्हणतात तेच मी बोललो आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही. पण तरीही माझ्या बोलण्याने कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द आणि माझे विधान मागे घेतो, असे वक्तव्य करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
अबू आझमी यांच्या मुलाचा राडा
औरंगजेबबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर दुसरीकडे अबू आझमी यांच्या मुलाने गोव्यात राडा केला आहे. त्यांच्या मुलाने गोव्यात राडा करत इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे सोमवारी रात्री मोठा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी अबू आझमींच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अबू आझमी यांच्या मुलासह झीऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, फरहान आझमी, शाम आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अबू आझमींचं नेमकं स्पष्टीकरण
अबू आझमीं म्हणाले, “इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारावर मी हे वक्तव्य केलं होत. मी महापुरुषांविषयी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. पण माझ्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आणि कुणाला वाटत असेल की मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो. विधानसभेचं कामकाज सुरु राहायला पाहिजे. त्याचबरोबर विधानसभेला खूप सारी काम आहेत त्यामुळे या मुद्द्यावरून रोखणं योग्य नाही,” असं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलं.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी