आज सकाळी २ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक-गुजरात हायवेवर भीषण अपघात झाला. सातपूर घाटात हा अपघात झाला असून एक खाजगी लक्झरी बस २०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले तर १५ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, जखमी प्रवाशांची चिंताजनक स्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.
पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की जागीच त्या बसचे दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शन करून ही बस गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेल्या बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील रहिवाशी असल्याच सांगण्यात येत आहे. हा भीषण अपघात कसा झाला याचे अद्याप कारण कळले नाही परंतु बस चालक मद्यपान करून बस चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक भागात खास करून घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात धुकं असतं. त्यामुळे सुद्धा हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. भीषण अपघातात बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा :
Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद