Tuesday, June 6, 2023

Latest Posts

अपघाताचे सत्र सुरूच, नाशिकमध्ये आयशरची कंटेनरच्या धडकेमध्ये मायलेकींचा मृत्यू

सध्या अपघाताचे सत्र हे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. तर आज सकाळपासून दिवसभरत तब्बल ३ अपघात हे झाले आहे.

सध्या अपघाताचे सत्र हे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. तर आज सकाळपासून दिवसभरत तब्बल ३ अपघात हे झाले आहे. तर आतापर्यंत १०-१२ नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ ही उडाली आहे. सकाळी एकीकडे नागपूर-पुणे महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यात एक अपघात आला तर दुसरीकडे अरावतीमध्ये दर्यापूर – अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्यातच आणखी एका अपघाताची नोंद हि झाली आहे. नाशिक शहरात हा भीषण (Nashik) अपघाताची घटना घडली आहे. नाशिकमधील द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये (Eicher) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे

सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक शहरात (Nashik City Accident) देखील अपघाताच्या घटनांचे प्रमाण हे सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आडगाव द्वारका उड्डाणपुलावर आज अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा तपास पंचवटी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नाशिक ते मुंबई या मार्गावर द्वारका ते आडगाव हा उड्डाणपूल आहे. या मार्गावर अनेकदा अनेक वाहने हे बंद प[पडत असतात. मात्र सुरक्षेची कुठलीही काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. चॉप किंवा पोलीस दोन्हीकडून सुरक्षतेच्या काळजीबाबत पर्शनशीनच हा उपस्थित होत आहे. आज द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर एक आयसर हा बंद अवस्थेत उभा होता. सकाळच्या सुमारास कंटेनरने आयसरला पाठीमागून जोरदार धडक दिली. तर या कंटेनरमध्ये चालकाच्या सोबत एक आई आणि तिची मुलीचा देखील होती परंतु या अपघातात या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे. इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता आणि याचवेळी नाशिक शहरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला.

अनेक ठिकाणी मोठं मोठे अपघात हे होत आहेत. सकाळी एक अपघात नागपूर-पुणे महामार्गावर देखील आहे. नागपूर-पुणे महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावा जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात भीषण होता की या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी ६.१५ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तर दुसरीकडे अरावतीमध्ये दर्यापूर – अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

हे ही वाचा:

मोठी बातमी! मी मुंबईत बॉम्बस्फोट…, ट्विटरवरून दिली धमकी

राज्यात २ भीषण अपघातांची नोंद, लग्नावरुन परतताना Amravati जवळ अपघात, ५ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss