उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं. त्यातचं करुणा शर्मा यांनी या प्रकरणावर काल प्रतिक्रिया दिल्यानंतर आज ५ मार्च २०२५ रोजी पुन्हा एकदा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणीच करुणा शर्मा यांनी केली आहे.
डिसेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील एका सरपंचाच्या हत्येप्रकरणी त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर ८२ दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात आली. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होत. या प्रकरणाबाबत अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली तर विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले.
बहीण भाऊ नाटकात हवे होते
धनंजय मुंडे यांच्या जीवावर पंकजा मुंडे मंत्री झाल्या. आज तुम्ही तोंड उघडत आहात. तीन महिने कशाला गप्प होत्या? संतोष देशमुख यांच्या घरी तुम्ही जायला हवं होतं. मग आता तुम्ही समोर येऊन ॲक्टींग कशाला करतायत? हो दोन्ही बहीण भाऊ नाटकात हवे होते, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली आहे. याचबरोबर वाल्मिक कराड आणि त्याचे चेले यांना मुख्य आरोपी घोषित केलं पाहिजे, अशी मागणी करुणा शर्माने केली आहे.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश