बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या हत्याकांडातील जेमतेम सगळ्या आरोपींना अटक केली आहे. तर १ आरोपी फरार आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघेही ११ डिसेंबरला भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला आला होता. मात्र, भिवंडीत आसरा न मिळाल्याने त्याच दिवशी ते भिवंडीतून गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं भिवंडीत ?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले भिवंडीत लपण्यासाठी आल्यानंतर त्यांनी सामाजिक संस्था चालवणारे सोन्या पाटील यांचे कार्यालय गाठले. सोन्या पाटील सामाजिक काम करत असून ते समाज कल्याण न्यासचे संस्थापक आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कामं केली आहेत.त्यांच्याकडे विक्रम डोईफोडे हे संस्थेत सचिव म्हणून काम करतात. विक्रम यांचे गाव डोईफोडवाडी असून मस्साजोग पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुदर्शन घुले हा विक्रम डोईफोडे यांना ओळखत होता. तसेच सुदर्शन घुले याच्या गावातील मुलगा रवी हा विक्रम डोईफोडे कडे काम करत होता हे सुदर्शन घुलेला माहीत होते . परंतु सुदर्शन घुले कडे कोणाचेही संपर्क नंबर नसल्याने त्यांनी सर्वप्रथम भिवंडीत दाखल झाल्यानंतर समाज कल्याण न्यासचे कार्यालय गाठले.
त्यानंतर त्या कार्यालयावर सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांना प्रथम भेटले व त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाच्या शेजारी राहणारे विक्रम डोईफोडे बारचे मालक आहेत यांच्याबद्दल विचारणा केली. कारण सुदर्शन घुले यांना माहीत होते की सोन्या पाटील यांच्या संस्थेत विक्रम डोईफोडे काम करतात. तसेच सुदर्शन घुले याच्या गावचा मुलगा रवि बारगजे विक्रम डोईफोडे कडे काम करतो. त्यामुळे त्यांनी सोन्या पाटील यांच्या कार्यालयावर चौकशी केली. परंतु सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनी ही माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली आणि त्यानंतर डोईफोडे यांचा पत्ता मिळाल्यानंतर सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार वळपाडा येथील बार वर पोहोचले व एक-दोन दिवस लपण्यासाठी मदत मागितली. परंतु त्या ठिकाणी विक्रम डोईफोडे हे बाहेर होते आणि कामगारांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट मनाई केली त्यानंतर हे तिन्ही आरोपी तेथून निघून गेले.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?