सध्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या विरोधात उभं राहून अजित पवार यांनी आपली वेगळी भूमिका मांडली. अजित पवार यांनी आपला प्रवास सुरु केला आणि अजित पवार हे भाजप – शिवसेना मध्ये सामील झाले. अजित पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शरद पवार गटाकडून करण्यास सुरुवात झाली. तसेच अजित पवार हे गटामध्ये जाऊन स्वतः सभा घेत आहेत. या सगळ्यावर अजित पवार आणि शरद पवार हे शुक्रवारी एकत्र येणार होते पण अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.
पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते. हे दोघंही मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त एकत्र येणार होते. व्हीएसआयच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. बैठकीला व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार आणि संस्थेचे संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे पण उपस्थित राहणार होते. राज्यातील पक्ष फुटीनंतर दोन्ही नेते एकत्र येणार होते. पण अजित पवार यांनी या बैठकीला जाणे टाळले आणि ते दौंडच्या प्रवासाला गेले.
अजित पवार आणि शरद पवार हे १२ ऑगस्टला एकत्र येणार होते. साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखानदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पण त्याच दिवशी पुण्यातील चांदणी चौकाचे उदघाटन होते. त्यामुळे अजित पवार गेले नाही. शरद पवार आणि अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. परंतु आता काका आणि पुतण्या या दोघांना एकत्र येण्याची संधी होती. पण यावेळी सुद्धा अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.
हे ही वाचा:
या गावात राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घातली आहे, कोणतं आहे ‘ते’ गाव घ्या जाणून…
हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार, नाना पटोले यांचा हल्लाबोल