मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनाम्यासाठी मागील ३ महिन्यांपासून जोर धरला जात होता. त्यातच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले होते. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आज (४मार्च) रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. यामागचे कारण म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच प्लॅनींग असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना आज राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए मार्फत हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर काल रात्री देवगिरीवर एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मोठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागितल्याच बोललं जात असतानाचं आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया :
मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात माहिती दिली असून ” राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्याचा मी स्वीकार देखील केला आहे. पुढची कार्यवाही करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हे ही वाचा:
आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण घटना सत्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे,आरोपीच्या भावाचं वक्तव्य
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.