बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. वाल्मिक कराड याच्या घरातील लोकांची चौकशी सुरू झाली, म्हणून ती शरण आलेला आहे. त्याची संपती लवकरात लवकर जप्त करावी. असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. मंगळवारी शरण आलेल्या वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केल्यानंतर आमदार धस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अक्शनमुळे वाल्मिक कराड याला शरण यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आभार. कराड याची संपती जप्त करावी, अशी मागणी केली आहे. तीन आरोपी अजून बाकी आहेत. राज्यकर्त्यांनी कोणी सांगितलं होतं का संतोष देशमुखला असे मारायला? स्वतःच्या अंगावर आल्यावर कराड काहीही बोलत आहे. मुख्यमंत्र्यांनी मोक्का बाबत घोषणा केली आहे. खंडणीसह इतर गुन्हे देखील त्यांच्यावर लागतील, असे धस म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही ते अजित पवार बघतील. उज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. आरोपी हा मी नाहीच त्यातला असेच म्हणत असतो, पण आता तपास यंत्रणा बघतील. कराड याच्या घरातील लोकांची चौकशी सुरू झाली आहे, असे धस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.