spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

वाल्मिक कराडला Mococa कायदा लावल्याने समर्थकांकडून आक्रमक भूमिका; परळी बंदची हाक

मस्साजोगचे सरपंच Santosh Deshmukh हत्या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. अखेर आज वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यावरून कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. २ कोटी खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या Walmik Karad वर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरात सध्या कडकडीत बंद झाली असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर येऊन टायर पेटवून, बंदची हाक देऊन या गोष्टीचा निषेध केला आहे. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा संशय पोलिसांना आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा,अशी धनंजय देशमुख व कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. वाल्मिक कराड याआधी खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्वत्र होत होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं व जर वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत गुन्हा दाखल नाही केला,तर आत्मदहन करू असा इशारा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

आज मकरसंक्रांत असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळं बंद करण्यात आलं आहे. तर, मुख्य आरोपी असलेल्या पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला सोडण्यात यावं, त्याला जातीय राजकारणाचा बळी केला जातोय असा आरोप वाल्मिक कराडच्या आईने आणि पत्नीने परळी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या पत्नीने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांची आंदोलनात तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांनी पाणी पिण्यास देखील नकार दिला आहे.त्यामुळे वाल्मिक कराड च्या मकोका कायद्यावरून सर्वत्र खळबळ माजली आहे.

Latest Posts

Don't Miss