महाराष्ट्रात कुशल प्रशासकाच्या यादीमध्ये अनेक कुशल राज्यकर्त्या स्त्रियांचीही नावे अग्रस्थानी पाहायला मिळतात.असेच ए महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे नाव म्हणजे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ हे आहे. अशा कर्तृत्त्ववान स्त्रियांमुळे महाराष्ट्राला धाडसी स्त्रियांचा वारसा लाभला आहे. यंदा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्ष आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अहिल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, सांगोला विधानसभा आमदार रोहित आर. आर. पाटील तसेच कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या महोत्सवामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा, धनगरी गजी नृत्य, धनगरी ढोल अशा विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर विविध मान्यवरांचा सन्मान व शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळींना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हे ही वाचा :
मुंबईत खळबळजनक घटना ! भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह
Sushil Karad विरूद्धच्या खटल्यात पोलीसांचा अहवाल दाखल