Wednesday, November 29, 2023

Latest Posts

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

परिवहन कार्यालयातून एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे वाहन परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर झाल्यास यात आश्चर्य वाटायला नको.

परिवहन कार्यालयातून एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे वाहन परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर झाल्यास यात आश्चर्य वाटायला नको. असाच धक्कादायक प्रकार अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर परिवहन विभागात (Shrirampur RTO Office) समोर आला आहे. तक्रारदाराला सत्य समजल्यावर त्याने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या सगळ्या प्रकारामुळे श्रीरामपूर परिवहन विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संगमनेर तालुक्यातील अश्वी येथील गौतम गायकवाड यांनी एका खाजगी फायनान्स कंपनीकडून चार लाख 55 हजार वाहन कर्ज घेऊन मारुती वॅगनर गाडी घेतली होती. कर्जाचे नियमित हप्ते फेडत गायकवाड यांनी दोन लाख 30 हजार रुपये देखील भरले. मात्र कोविड काळात दोन हप्ते थकल्याने त्या संदर्भात पत्र व्यवहार करून नाशिक कार्यालयात गेले असता 21 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीने मार्च 2022 मध्ये जयपूर येथे सुनावणीस हजर राहण्याचे पत्र दिल्याने तेथून परतत होते. त्याच वेळेस द्वारका सर्कल नाशिक येथे फायनान्स रिकव्हरी एजन्सीच्या लोकांनी गायकवाड यांच्या मालकीची एमएच 17 बीएक्स 6009 क्रमांकाची गाडी न्यायालयीन प्रकरण असतानाही गोडाऊनला लावून घेतली.

 

या संदर्भात फायनान्स कंपनी आणि रिकव्हरी एजन्सीकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ काढला. मात्र जेव्हा गायकवाड यांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता वाहनाचे मूळ आरसी बुक स्वतःकडे असतांना देखील श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील काही दलाल आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही मागणी केलेली नसताना बेकायदेशीर खोट्या सह्या, बनावट व्यक्ती आणि गायकवाड यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड जोडून अहमद रसूल पटेल या इसमाच्या नावे गाडी हस्तांतरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान याविषयी परिवहन विभागाशी संपर्क साधला असता एकही अधिकारी बोलायला तयार झाली. माजी परिवहन मंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी मात्र परिवहन विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल करणे गरजेचे असलायच स्पष्ट केले आहे. परिवहन विभागाला दलालांचा विळखा पडला असून परिवहन विभागाने कामकाजात बदल करणे गरजेचं असल्याचे सांगितलंय. मात्र, असा प्रकार याआधी किती जणांसोबत झालाय, किती जणांना अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडावं लागले असेल, याचीही चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss