spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?

बीड (Beed) जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणाबाबत अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यातच 13 जानेवारीला मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सहभागी झाले होते. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. “माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणार” अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली. याच गोष्टीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीकास्त्र उभारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातूनराज्य सरकारवर टीका केली आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं. राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या.

हे ही वाचा:

Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

मुख्यमंत्र्यांनी बीडचे SP,CID अधिकाऱ्यांना फोने; कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी…….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss